
हे चार पाय घरात असले की घरात एक positive energy असते. सर्वात वफादार अणि जिवाभावाच्या मित्रात याची वर्णी लागते. पण ह्याच जिवाभावाच्या मित्राला आपण नकळत किंवा माहिती असून ज्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत असे काही तरी करून बसतो.
आता म्हणाल तर कुत्रे आणि मांजरी पाळणे एक क्लास बनला आहे. पूर्वीच्या काळी लोक हे सर्व करत होते पण आता जो तो उठतो तो हे सर्व करत आहे. पण एखादी जिवंत गोष्ट घेताना, त्याचे पालन कसे होईल ह्याची काळजी घेतली जात नाही.
जस आपल्याला स्वातंत्र्य हवे असते, तसेच हे सर्व स्वातंत्र्य त्यानाही लागू होते. बर्याच वेळा वेळ जात नाही म्हणुन कुत्रे किंवा मांजरी कधी पक्षी पाळले जातात. पण नंतर त्यांचे संगोपन करू शकत नाही म्हणुन त्यांना बर्याचदा रस्त्यावर सोडून दिले जाते. काही ठिकाणी ऑफिस किंवा ईतर जबाबदारी असते म्हणुन हे जीव घरी एकटे असतात तसेच त्यांना योग्य खाणे पिणे अणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फिरावंले जात नाही. आपलेच उदाहरण घेऊया, आपल्याला पण असाच काही केल अस इमॅजिन जरी करायला सांगितले तरी जीव कासावीस होतो.
अजून एक सांगावेसे वाटते की आपले भारतीय प्राणी पाळणे म्हणजे कमी पणाचे वाटते. हे प्राणी याच वातावरणात कित्येक वर्षापासून वाढल्याने त्यांना आपले भारतीय अन्न लगेच पचते, त्यांना विशेष निगराणीचि गरजही नसते.
काही पांढरपेशी लोक मादी घरी आणतात, पण त्यांचे नैसर्गिक प्रजनन होण्या आधीच ऑपरेशन केले जाते. ही काय शोभेची वस्तू आहे का? तुम्ही भारतीय प्राणी आणा किंवा विदेशातील प्राणी आणा , शेवटी त्यांना तुमचे प्रेम, योग्य संगोपन अणि घरातील ईतर सदस्या प्रमाणे वागणुक अणि काळजीची गरज असते.

