मुंबईची lifeline, मुंबई लोकल!

मुंबईची लोकल ट्रेन म्हटली कि ट्रेन पकडायची घाई, गर्दी त्यातच तीच ट्रेन मिळेल का हे सर्व वेळेचं calculation करून मुंबई चा नोकरदार वर्ग पहाटेच्या कोंबड्याच्या बांगेपासून कामाला लागतो. सर्वकाही घड्याळ्याच्या काट्यावर काटेकोरपणे चालणारा मुंबईचा चाकरमान्या रोज सर्व राग, दुःख सोडून हसत रोज नव्या दमाने लोकल पकडतो.

आतातर जरा लवकरच ५ मिनिट निघावं लागत कारण जागोजागी रस्त्याची काम, मेट्रो, अजून काहीतरी नवं जणूकाही एवरेस्ट पार करून यावं लागत . हे सर्व करून ऑफिसमध्ये ओठावर हसू ठेऊन कामाला लागणं माझ्या मते हा तर सर्वात मोठा टास्क आहे.

या लोकल ट्रेन च्या गर्दीत सर्व प्रकारच्या emotions बघा याला मिळतात, सर्व वयोगटातील सदस्य, सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे ट्रेंड टॉप्स, जीन्स, साड्या, ड्रेस. एखादा सण आला की ही लोकल जणू स्वतः च सण साजरे करत आहे असे भासते.

जो नवीन व्यक्ति या गर्दीत वाढला तरी ही लोकलची गर्दी त्याला सामावून घेते. या गर्दीत कुठे धर्म, जात, पंथ माणूस विसरलेला असतो, ईथे फक्त एकाच अपेक्षित असते की आपण एकमेकांना कस adjust करू शकतो.

पण ज्या दिवशी ही बंद किंवा विस्कळित होते, तेव्हा मात्र मुंबईच्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडते. 

मुंबई बाहेर जे लोक राहतात त्यांना मुंबई लोकलच खास आकर्षण असते.  कधीतरी एखादा मुंबईला येऊन एकदातरी प्रवास करावा हे प्रत्येकाच्या मनात असत. 

काळानुरूप ह्या लोकल ट्रेनने कात टाकून नवीन रुपात आली आहे अन दिवसेंदिवस प्रगतीच करत आहे. आणि या तिच्या प्रवासात प्रत्येक मुंबईकर तिची कधीच साथ सोडणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *